-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा डे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
-
ईशाचा नवरा नेमका कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचे सगळे चाहते प्रचंड उत्सुक होते. अखेर वनिता खरातने लाडक्या मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यातील काही Inside फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
ईशा डेच्या नवऱ्याचं नाव आहे अभिषेक खणकर. तो लेखक व गीतकार म्हणून ओळखला जातो.
-
अभिषेकने ‘खुलता कळी खुलेना’, ‘लक्ष्मी निवास’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांसाठी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
-
यासह, ‘६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात अभिषेकचा सन्मान करण्यात आला होता. त्याने ‘अनन्या’ चित्रपटासाठी लिहिलेल्या “तू धगधगती आग” या गीतासाठी अभिषेकला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
-
वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकर, रोहित माने, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, मकरंद देशपांडे, आकांक्षा गाडे असे सगळे कलाकार ईशाच्या लग्नाला उपस्थित होते.
-
या कलाकार मंडळींनी ईशाच्या लग्नातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी, त्यावर सोनेरी काठ असलेली शाल, गळ्यात हार, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या लूकमध्ये ईशा खूपच सुंदर दिसत होती.
-
ईशा व अभिषेकवर संपूर्ण मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : ईशा डे व वनिता खरात इन्स्टाग्राम )
Robert Kiyosaki: “मी पुन्हा एकदा इशारा देत आहे”, कोसळत असलेल्या शेअर बाजाराबाबत ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत