-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय आणि प्रभावशाली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डेचं औचित्य साधत अपूर्वाने तनुज गोवळकरबरोबर लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर हे नवविवाहित जोडपे गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर फिरायला गेले होते.
-
अपूर्वा आणि तनुजने गोव्यातील काही खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
आता हे लाडकं जोडपं गोव्यानंतर ऐतिहासिक हंपी शहराच्या सहलीसाठी रवाना झालं आहे.
-
अपूर्वाने सोशल मीडियावर त्यांच्या प्रवासाचे आणि विमानतळावरील काही आनंदी फोटो शेअर केले आहेत.
-
विमानतळावरील या फोटोंमध्ये अपूर्वा आणि तनुजचा कॅज्युअल पण कूल अंदाज चाहत्यांना विशेष भावतोय.
-
हंपीच्या ऐतिहासिक वास्तू आणि सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी हे नवविवाहित जोडपे सज्ज झाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
UPSC परिक्षा पास होण्याच्या आनंदात मिरवणूक काढली, मुलाखती दिल्या; मात्र सत्य समोर येताच सर्वांना बसला धक्का