-
अभिनेत्री सान्या मल्होत्राचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे.
-
सान्याने मुंबईत स्वतःचे नवीन घर खरेदी केले आहे. अनेक वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर तिने हे घर घेतले आहे.
-
सान्याने सोशल मीडियावर तिच्या नवीन घराचे फोटो शेअर करून गृहप्रवेशाची झलक दाखवली आहे.
-
डोक्यावर कलश आणि हातात नारळ घेऊन सान्याने घरात प्रवेश केला, यावेळी पंडितजींनी मंत्रोच्चार करून विधीवत पूजा पार पाडली.
-
सान्याने मुंबईतील जुहू भागात नवीन घर घेतलंय.
-
हे घर अतिशय प्रशस्त असून तिथून समुद्राचे सुंदर दृश्य दिसते.
-
३४ वर्षांची सान्या मल्होत्रा मुळची दिल्लीची आहे.
-
अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिने मुंबईत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
सान्याने २०१६ मध्ये ‘दंगल’ चित्रपटातून पदार्पण केल्यापासून सातत्याने मेहनत केली आणि आता १० वर्षांच्या आत तिने हे स्वप्न पूर्ण केले आहे.
-
सान्याने तिच्या आवडीनुसार या घराचे इंटिरिअर अतिशय साध्या, सुटसुटीत आणि ‘मिनिमलिस्टिक’ पद्धतीने केले आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराची किंमत साधारणपणे १४.३ कोटी रुपये इतकी आहे. तिने या घरासाठी अंदाजे ८५ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली होती. (सर्व फोटो- सान्या मल्होत्रा इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?