-
बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधून अभिनेता वैभव चव्हाण घराघरांत पोहोचला. त्याने नुकतीच त्याच्या चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे.
-
वैभव चव्हाण व त्याच्या कुटुंबीयांनी नवीन फार्महाऊस बांधलं आहे.
-
या सुंदर फार्महाऊसची पहिली झलक अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
-
वैभव आणि त्याच्या कुटुंबीयांनी नुकताच या फार्महाऊसमध्ये गृहप्रवेश केला.
-
वैभवने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या आई-बाबांनी वास्तूशांती पूजा केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
वैभवचं हे नवीन फार्महाऊस खूपच प्रशस्त आहे. या घराच्या आजूबाजूला शेती, हिरवागार परिसर आहे.
-
वैभवने या फोटोंना “गृहप्रवेश…फार्महाऊस” असं कॅप्शन दिलं आहे.
-
संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्यावर या नव्या फार्महाऊससाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
दरम्यान, वैभवच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस मराठी’च्या आधी ‘मन झालं बाजिंद’ या ‘झी मराठी’च्या मालिकेत त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. ( सर्व फोटो सौजन्य : वैभव चव्हाण इन्स्टाग्राम )
-
( सर्व फोटो सौजन्य : वैभव चव्हाण इन्स्टाग्राम )
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?