-
‘स्टार प्रवाह परिवार’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून, यावर्षी ‘महाराष्ट्राची महामालिका’ कोण ठरणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर यंदाच्या वर्षीच्या विजेत्यांची यादी आता प्रेक्षकांसमोर आलेली आहे.
-
गेली दोन वर्षे सलग ‘ठरलं तर मग’ ही मालिका ‘महाराष्ट्राची महामालिका’ ठरतेय. यंदा त्यांच्याकडे हॅटट्रिक करण्याची संधी होती. पण, ही संधी हुकली आहे.
-
यावर्षी ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका ‘महाराष्ट्राची महामालिका’ ठरली आहे.
-
याशिवाय या टीमने पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत.
( हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ची हॅटट्रिक थोडक्यात हुकली…! ‘ही’ झाली महाराष्ट्राची महामालिका, सर्वोत्कृष्ट जोडी आहे…; वाचा विजेत्यांची यादी ) -
सर्वोत्कृष्ट जोडी हा पुरस्कार पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांना विभागून देण्यात आला आहे.
-
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील मानिनी सर्वोत्कृष्ट सासू ठरली आहे.
-
तर, सर्वोत्कृष्ट सासरे ठरले आहेत ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम विक्रमादित्य देशमुख.
-
सर्वोत्कृष्ट परिवार ठरला आहे अर्णव-ईश्वरीचा राजेशिर्के परिवार ( तू ही रे माझा मितवा ).
-
तर, टीआरपी टॉपर असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला यंदा फक्त एकच पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळालाय सायलीला. ती यावर्षी ‘सर्वोत्कृष्ट सून’ ठरली आहे. ( सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह इन्स्टाग्राम )
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?