-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगतापचा जांभळ्या रंगाच्या गाऊनमधील ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
वीणाने परिधान केलेल्या या मरमेड स्टाईल गाऊनवर बारीक सिक्विन वर्क आणि खांद्यावर असलेल्या फुलांच्या डिझाईनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
-
या खास लूकसाठी वीणाने अतिशय मोजकेच पण उठावदार दागिने परिधान केले असून कानातील सुंदर इयररिंग्स तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
वीणाच्या या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली असून कमेंट्समध्ये तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
‘कलर्स मराठी’वरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून वीणा जगताप घराघरामत पोहोचली असून तिची राधाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
अभिनयासोबतच वीणा आपल्या हटके फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते, ज्याची प्रचिती तिच्या या नवीन फोटोंमधून पुन्हा एकदा आली आहे.
-
‘बिग बॉस मराठी’च्या सीझन २ मध्ये सहभागी झाल्यानंतर वीणाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आणि ती एक चर्चेतील चेहरा बनली.
-
सध्या वीणा ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वीणा जगताप/इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?