-
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचे लग्न नुकतेच पार पडले असून, आता त्यांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
हळदीच्या या विशेष सोहळ्यासाठी रश्मिकाने पिवळ्या रंगाऐवजी अत्यंत मोहक अशा ‘पेस्टल ग्रीन’ रंगाच्या वन-शोल्डर ड्रेसची निवड केली आहे.
-
विजय देवरकोंडाने या खास प्रसंगी हलक्या गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिधान करून आपला साधा, पण रॉयल लूक जपला आहे.
-
या सोहळ्यात केवळ हळदच नाही, तर पिवळ्या फुलांच्या पाकळ्यांच्या वर्षावात ही जोडी आनंदाने न्हाऊन निघाल्याचे दिसत आहे.
-
रश्मिकाने आपल्या या लूकसाठी सोन्याच्या जड बांगड्या आणि कपाळावर नाजूक माथापट्टी, असा पारंपरिक साजशृंगार केला आहे.
-
फोटोंमध्ये विजय व रश्मिका एकमेकांना हळद लावताना आणि मनसोक्त हसतानाची त्यांची केमिस्ट्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर होताच अवघ्या काही तासांतच चाहत्यांनी या लाडक्या जोडीवर लाखो लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.
-
अतिशय खासगी पद्धतीने पार पडलेल्या या शाही सोहळ्यातील प्रत्येक क्षण आता चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?