-
रश्मिका मंदाना अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासह लग्नबंधनात अडकली. त्यामुळे गेली काही दिवस दोघेही अनेकांच्या चर्चेचा विषय बनले होते.
-
विजयबरोबर थाटामाटात पारंपरिक पद्धतीने लग्न केल्यानतंर रश्मिकाने आता कामाला सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो शेअर केला आहे.
-
‘राणाबल्ली’ – अलीकडेच नवीन वर्षात घोषणा झालेल्या या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट रश्मिका मंदानासाठी खास आहे. कारण- यामधून ती तिचा नवरा विजय देवरकोंडासह लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. ‘रणबल्ली’ हा एक ऐतिहासिक चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. दोघेही यामधून ऐतिहासिक भूमिकेतून पाहायला मिळणार आहेत. दोघांच्या लग्नानंतर अजय-अतुल यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातील प्रोमो साँगही प्रदर्शित झाल्यावर त्याला प्रेक्षकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला. हा चित्रपट २०२६ मध्ये ११ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे
-
ॲनिमल पार्क - रश्मिका मंदानाकडे असलेल्या सहा चित्रपटांमधील हा शेवटचा चित्रपट आहे. रणबीर कपूर व रश्मिका मंदाना यांची जोडी ‘ॲनिमल’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पाहायला मिळाली. त्यामुळे आता या ब्लॉगबस्टर चित्रपटाच्या सीक्वेन्सची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपटही पुढच्या वर्षीच चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. परंतु, या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.
-
कॉकटेल २ – २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या रश्मिका मंदानाच्या दुसऱ्या चित्रपटाचे नाव आहे ‘कॉकटेल २’. या रोमँटिक कॉमेडी सीक्वेलमधून ती शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनसह स्क्रीन शेअर करणार आहे. अद्याप चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.
-
पुष्पा ३ – ‘पुष्पा’ व ‘पुष्पा २’ या चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे २०२६ मध्येच रश्मिकाचा हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
-
मायसा – हा एक तेलुगू चित्रपट असून, त्यामध्ये रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहे. रवींद्र फुले दिग्दर्शित हा एक ॲक्शन थ्रिलर पॅन इंडिया चित्रपट २० मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
Aa22 – ‘पुष्पा ३’व्यतिरिक्त रश्मिका मंदाना अल्लू अर्जुनबरोबर अॅटली यांच्या या आगामी सायन्स फिक्शन चित्रपटातून झळकणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणही महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
-
त्यामुळे येत्या काळात रश्मिका लवकरच वेगवेगळ्या चित्रपटांतून झळकणार आहे. सर्व (फोटो : इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?