-
मृणाल ठाकूरने आपल्या दमदार अभिनयाने हिंदी, दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
तिच्या सौंदर्याने आणि निखळ हास्याने तिने जगभरातील लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
-
सध्या सोशल मीडियावर मृणाल ठाकूरची एक विशेष पोस्ट प्रचंड चर्चेत आली असून, ती वेगाने व्हायरल होत आहे.
-
पुण्यात आल्यावर मृणालने प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.
-
मृणालने या दर्शनाचे काही खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मृणालचा लूक अत्यंत साधेपणाने नटलेला असून, तिने लाल रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला आहे.
-
फोटो शेअर करताना तिने ‘पुण्यात आलो आणि बाप्पाचे दर्शन घेतले नाही, तर काय केले?’ अशी खास मराठीत कॅप्शन दिली आहे.
-
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत तिच्या साधेपणाचे भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?