-
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी मंचूने (Lakshmi Manchu) नुकताच आपल्या मुलीसाठी, विद्या निर्वानासाठी एक खास सोहळा आयोजित केला होता.
-
लक्ष्मी मंचूची मुलगी विद्या निर्वाना आता मोठी झाली आहे.
-
मुलीच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याचं म्हणजेच तिच्या पहिल्या मासिक पाळीचं सेलिब्रेशन लक्ष्मीने ‘हाफ सारी’ सोहळा आयोजित करून केलं.
-
लक्ष्मीने या सोहळ्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
फोटोंमध्ये, लक्ष्मीने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तर तिची लेक विद्या हिने सोनेरी व फिकट गुलाबी ‘हाफ सारी’ नेसली होती.
-
लक्ष्मी मंचूने लेकीच्या या खास दिवसासाठी सुंदर सजावट करून घेतली होती.
-
लक्ष्मी मंचूच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
काय आहे ‘हाफ सारी सेरेमनी’?
What is Half Saree Ceremony : दक्षिण भारतात एखादी मुलगी जेव्हा वयात येते, म्हणजेच तिला पहिली मासिक पाळी येते, तेव्हा तिच्या स्त्रीत्वाचा स्वीकार करण्यासाठी आणि तो क्षण आनंदात साजरा करण्यासाठी हा सोहळा केला जातो. याला तेलगूमध्ये ‘रितु कला संस्कार’ किंवा ‘पेद्दामनिषी पांडगा’ असेही म्हणतात. -
या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे मुलीने पहिल्यांदा ‘हाफ सारी’ नेसणं असतं. लहानपणी मुली परकर-पोलके घालतात, पण या वयानंतर त्या साडीचा एक प्रकार असलेल्या ‘हाफ सारी’ नेसू लागतात. ही हाफ साडी म्हणजे परकर, ब्लाउज आणि त्यावर ओढणी असते. हा मुलीचा बालपणाकडून तरुणपणाचा प्रवास मानला जातो.
Gudi Padwa 2026 Wishes: गुढीपाडव्याला प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; WhatsApp स्टेटसला ठेवा सुंदर HD PHOTOS