-
बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. यापैकीच एक म्हणजे सुहाना खान आणि खुशी कपूर.
-
सुहाना व खुशी यांच्याबरोबरच सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये असे अनेक नवोदित कलाकार आहेत, ज्यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. परंतु, यातील बऱ्याचशा स्टार किडसने चित्रपटगृहांपासून नाही तर ओटीटीपासून करिअरची सुरुवात केलीये.
-
सुहाना खान – शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिज’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु, तिचा हा पहिलाच चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न होता ओटीटीवर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला.
-
इब्राहिम अली खान – बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंह व अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा इब्राहिम अली खान यानेसुद्धा ओटीटीपासूनच करिअरची सुरुवात केली. इब्राहिम याने नेटफ्लिक्सवरील ‘नादानियां’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली, तर यामध्ये खुशी कपूर नायिकेच्या भूमिकेत झळकलेली.
-
आर्यन खान – शाहरुख खानबरोबर सध्या त्याची दोन्ही मुलं सुहाना खान व आर्यन खान मनोरंजन विश्वात सक्रिय झाले आहेत. आर्यन खानने २०२५ मध्ये ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सुपरहिट सीरिजमधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. नेटफ्लिक्सवर त्याची ही सीरिज ट्रेंडिंगमध्ये होती.
-
अगस्त्य नंदा – बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यानेसुद्धा जोया अख्तरच्या ‘द अर्चिज’ या चित्रपटातून ओटीटीवरून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
-
खुशी कपूर – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरनेही ‘द अर्चिज’ या चित्रपटातून ओटीटीवरूनच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
-
जुनैद खान – आमिर खानचा मुलगा जुनैद खान यानेसुद्धा ओटीटीपासूनच त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याचा ‘महाराज’ हा पहिला चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला.
-
सुहाना खान, खुशी कपूर, जुनैद खान, आर्यन खान, इब्राहिम अली खान, अगस्त्य नंदा या सर्व स्टार किड्सने ओटीटीपासूनच त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
शाळेत कराटे सरावादरम्यान मुलीच्या पोटात दुखापत…तातडीने रुग्णालयात नेऊन तपासणी अन् निदानानंतर बसला धक्का