-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने यंदाचा गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
लग्नानंतरचा अपूर्वाचा हा पहिलाच गुढीपाडवा असल्याने तिच्यासाठी हा सण अत्यंत खास आणि आनंदाचा ठरला आहे.
-
अपूर्वाने पती तनुज गोवळकर याच्यासोबत पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून या नववर्षाचे स्वागत केले.
-
सध्या अपूर्वा बेंगळुरूमध्ये असून तिने परराज्यात राहूनही आपली संस्कृती आणि परंपरा जोपासत हा सण साजरा केला आहे.
-
या खास दिवशी अपूर्वाचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून तिने गुलाबी रंगाची भरजरी पैठणी नेसली होती.
-
पारंपरिक दागिने, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावून अपूर्वाने आपला गुढीपाडवा लूक पूर्ण केला होता.
-
पाडव्याच्या मुहूर्तावर अपूर्वाने घराच्या बाल्कनीत आकर्षक गुढी उभारली होती आणि हातात पूजेचे ताट घेऊन तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
-
सण म्हटल्यावर जेवणाची चंगळ तर आलीच, अपूर्वाने पाडव्यानिमित्त श्रीखंड-पुरी आणि बटाट्याची भाजी अशा सात्विक बेताचा आस्वाद घेतला.
-
(सर्व फोटो सौजन्य: अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
मुलगी मोठी झाली! प्रसिद्ध अभिनेत्रीने मुलीच्या ‘पहिल्या पाळी’निमित्त आयोजित केला सोहळा, पाहा Photos