-
Gudi Padwa 2026: दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याचा सण आणि मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
-
नववर्षाची ही पहाट नवी आशा, स्वप्ने आणि सकारात्मकतेचा संदेश घेऊन आली आहे. याच उत्साहात मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) देखील सहभागी झाली होती.
-
गुढीपाडव्याच्या निमित्ताने दक्षिण मुंबईतील गिरगाव (Girgaon Shobha Yatra 2026) येथे भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
-
गिरगावातील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत रुपालीने आवर्जून हजेरी लावली आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
-
या खास प्रसंगी रुपालीने मोरपंखी रंगाची खणाची नऊवारी साडी परिधान केली होती.
-
या लूकवर रुपालीने परिधान केलेले पारंपारिक दागिने तिचे सौंदर्य खुलवत होते.
-
विशेषतः केसांत माळलेली चाफ्याची फुले आणि साजेसा मेकअप यामुळे रुपालीचा हा लूक सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
Kim Jong Un North Korea Election : उत्तर कोरियात किम जोंग उन यांचा ९९.९३% मतांनी विजय; विरोधातील ‘त्या’ ०.०७ टक्के मतांचं काय?