-
‘इंडियन आयडल’ या गाण्याच्या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली मराठमोळी गायिका म्हणजे सायली कांबळे.
-
सायली कांबळेने एकाहून एक गाणी सादर करत मराठीसह हिंदी रसिक श्रोत्यांनादेखील मंत्रमुग्ध केलं आहे.
-
आपल्या गाण्यांनी चर्चेत राहणारी सायली सोशल मीडियावरसुद्धा तितकीच सक्रीय असते.
-
अशातच सायलीने काही दिवसांपूर्वी बाळ झाल्याची गुडन्यूज सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती.
-
तीन महिन्यांपूर्वी सायली आई झाली असून तिच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे.
-
अशातच आता सायलीने बाळाचे बारसेसुद्धा केले आहे. खास पोस्टद्वार तिने बाळाचं नावही जाहीर केले.
-
सायली म्हणते, “या नावाने आता एका सुंदर प्रवासाची सुरुवात होत आहे. हे नाव आहे वेद धवल सायली पाटील.”
-
सायली कांबळेने हिने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवल पाटीलबरोबर लग्न केले.
-
लग्नानंतर तीन वर्षांनी सायली कांबळेने पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.
-
दरम्यान, सायली कांबळे ही ‘इंडियन आयडल १२’ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती.
-
या शोमध्ये तिचा सुंदर आवाज आणि कमाल सादरीकरणाबद्दल नेहमीच खूप कौतुक झाले होते. (फोटो : इन्स्टाग्राम)
अग्रलेख: बाईबळीवर बोळवण?