-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या तिच्या आगामी ‘हे काय नवीन?’ (He Kay Navin) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
-
येत्या ३१ मार्चपासून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सध्या प्रिया या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्य्रग आहे.
-
वेबसीरिज प्रमोशनच्या निमित्ताने प्रियाने गुलाबी रंगाचा स्ट्राइप्स को-ऑर्ड सेट परिधान केला होता.
-
या वेबसीरिजमध्ये प्रियाबरोबर पती उमेश कामत, शुभांगी गोखले, उदय टिकेकर, सुयोग गोऱ्हे, राजसी भावे, ओंकार गोवर्धन, तन्वी कुलकर्णी आणि पायल जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
-
ही कथा ‘रमा’ (प्रिया बापट) आणि ‘आदित्य’ (उमेश कामत) या जोडप्याभोवती फिरते, ज्यांच्या लग्नाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
चाळिशीनंतरचे आयुष्य, ९ ते ५ ची नोकरी, कुटुंब नियोजन आणि व्यवसाय यांसारख्या सामान्य जोडप्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर ही सीरिज भाष्य करते.
-
वरुण नार्वेकर यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेली ही वेबसीरिज ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
अग्रलेख: बाईबळीवर बोळवण?