-
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची कन्या अभिनेत्री स्वानंदी बेर्डे (Swanandi Berde) सध्या आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
-
स्वानंदी सध्या गोव्याच्या (Goa Vacation) सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर सुट्ट्यांचा आनंद घेत असून, तिथले काही खास फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात स्वानंदीने स्विमिंग सूट परिधान करून बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
स्वानंदीच्या या बोल्ड अंदाजावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
केवळ अभिनयच नव्हे, तर स्वानंदीने उद्योजिका म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच स्वानंदीने ‘कांतप्रिया’ नावाचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. विशेष म्हणजे, आपल्या आई-वडिलांच्या नावावरून तिने या ब्रँडला हे नाव दिलं आहे.
-
स्वानंदीच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. ती एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आणि चित्रकार आहेच, शिवाय ज्योतिषशास्त्र व अंकशास्त्र या विषयांतही तिला विशेष रुची आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी बेर्डे/इन्स्टाग्राम)
‘या’ तारखेला जन्मलेली मुलं आईची घेतात खूप काळजी! लग्नानंतरही बायकोपेक्षा आईलाच देतात महत्त्व…