-
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘सॅम बहादुर’, ‘सरदार उधम’, ‘छावा’सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला बॉलीवूड अभिनेता म्हणजे विकी कौशल.
-
आपल्या दमदार अभिनयाने त्यानं अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या ‘छावा’ चित्रपटातील अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक झालं.
-
काही दिवसांपूर्वी पुरस्कार सोहळ्यात विकीनं त्याची मराठी सिनेमात काम करायची इच्छा असल्याचं सांगितलं होतं.
-
तसेच याच पुरस्कार सोहळ्यात विकीनं मराठी इंडस्ट्रीतल्या आवडत्या दिग्दर्शकाचं नावसुद्धा सांगितलं होतं.
-
विकीला ‘एखाद्या थोर नेत्यावरील मराठी सिनेमात काम करायला आवडेल का’, असं विचारलं होतं.
-
याचं उत्तर देताना विकी म्हणाला होता, “अशी खूप नावे आहेत. जो अनसंग हिरो असेल; त्याच्यावरचा सिनेमा करायला मला आवडेल.”
-
शेवटी त्याला मराठी सिनेमा करायला आवडेल का? आणि कोणत्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला आवडेल? असं विचारलं.
-
यावर विकी “मला मराठी सिनेमे आवडतात” असं उत्तर देत आवडत्या दिग्दर्शकांमध्ये नागराज मंजुळे, अविनाश अरुण या दिग्दर्शकांची नावे घेतली होती.
-
त्यामुळे आता विकी आगामी काळात कोणत्या मराठी सिनेमातून भेटीला येतोय, याची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : विकी कौशल आणि नागराज मंजुळे इन्स्टाग्राम)
VIDEO: “आईसाहेब Hats Off..” साडी नेसून विंचू चावला गाण्यावर जबरदस्त डान्स! दोघांच्या प्रत्येक स्टेपवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा