-
ओटीटी सध्या मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. विविध भाषेतील कलाकृती यामार्फत प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येतात.
-
हिंदी व दाक्षिणात्य भाषेतील सीरिज व चित्रपटांबरोबर आता मराठी सीरिज व चित्रपटही मोठ्या प्रमाणात ओटीटीवर रिलीज होऊ लागले आहेत. यापैकीच एक म्हणजे चित्रपट म्हणजे ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’.
-
हेमंत ढोमेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मराठीतील लोकप्रिय कलाकार यामध्ये झळकले आहेत. महत्त्वाचं म्हणजे बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं कोट्यवधींचा गल्ला जमावला. हा चित्रपट झी ५वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
-
देवखेळ – मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजलाही प्रेक्षकांचा चांगाला प्रतिसाद मिळाला.
-
अंकुश चौधरी व प्राजक्ता माळीची ही सीरिज झी ५ वर पाहू शकता.
-
लग्नाचा शॉर्ट – मराठीमध्ये अलीकडे अनेक प्रेमकहाणीवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लग्नाचा शॉर्ट
-
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर व अभजीत आमकर मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट काही दिवसांपूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर आला आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट रेंटनं पाहता येऊ शकतो.
-
‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई’ केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला. परंतु, बॉक्स ऑफिसवर याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अशताच आता ओटीटीवर हा सिनेमा काही दिवसांपू्र्वी रीलीज झाला आहे. झी ५वर हा चित्रपटा पाहता येईल.
-
हे काय नवीन? – प्रिया बापट व उमेश कामत यांची ही नवीन सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झी ५’ वर ३१ मार्चला प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो इन्स्टाग्राम)
‘या’ तारखेला जन्मलेली मुलं आईची घेतात खूप काळजी! लग्नानंतरही बायकोपेक्षा आईलाच देतात महत्त्व…