-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ (Me Savitribai Jotirao Phule) ही नवी मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) ‘सावित्रीबाई फुले’ यांची भूमिका साकारत आहे.
-
ही ऐतिहासिक भूमिका साकारताना मधुराणीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
भूमिकेविषयी बोलताना मधुराणी म्हणाली, “सावित्रीबाई फुले हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. अशा ‘युगस्त्री’ची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. आज आपण ज्या स्वातंत्र्यात वावरतोय, शिक्षण घेत आहोत आणि प्रगती करत आहोत, त्यामागे १५० वर्षांपूर्वी एका स्त्रीने दिलेला मोठा लढा आहे.”
-
ती पुढे म्हणाली, “मला या निमित्ताने सर्वांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय, याचा मला मनस्वी आनंद आहे. मनात थोडी धाकधूक आणि दडपण असले तरी एक वेगळीच उत्सुकता आहे. प्रेक्षकांनी या प्रवासात साथ द्यावी, हीच माझी अपेक्षा आहे.”
-
मधुराणीने नुकतेच केशरी रंगाच्या प्लेन साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या साडीतील लूकवर मधुराणीने ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
Baby Girl! लग्नानंतर ४ वर्षांनी ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई, बाळ झाल्यावर १४ दिवसांनी शेअर केली गुडन्यूज, म्हणाली…