-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम अभिनेत्री नम्रता संभेराव सध्या अमेरिकेतील डेट्रॉईट, मिशिगन (Detroit, Michigan) येथे फिरण्याचा आनंद घेत आहे.
-
परदेशात असूनही नम्रताने आपला मराठमोळा लूक जपला असून, तिने फिकट हिरव्या रंगाचा सुंदर प्रिंटेड कुर्ता आणि सलवार परिधान केली आहे.
-
तिने या पारंपरिक पेहरावावर पांढऱ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज मॅच करून एक कूल आणि कम्फर्टेबल फ्यूजन लूक तयार केला आहे.
-
मोकळे सोडलेले लांब सडक काळेभोर केस आणि कानातले झुमके तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत.
-
फोटोंमध्ये नम्रताच्या चेहऱ्यावरील हास्य तिची तिथली एक्साइटमेंट आणि आनंद स्पष्टपणे व्यक्त करत आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने “Growing, glowing, and embracing all that I am” अशी प्रेरणादायी कॅप्शन दिली आहे.
-
इतकंच नाही तर आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त करत तिने “Hey परदेस I Will flaunt my tradition anyway” असेही लिहिले आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला असून अनेकांनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- नम्रता संभेराव इन्स्टाग्राम)
Baby Girl! लग्नानंतर ४ वर्षांनी ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई, बाळ झाल्यावर १४ दिवसांनी शेअर केली गुडन्यूज, म्हणाली…