-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या अभिनेत्री ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.
-
शिवालीला तिचे चाहते ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून ओळखतात. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियात खूपच सुंदर असं फोटोशूट केलं आहे.
-
वेस्टर्न आऊटफिटमध्ये शिवाली खूपच सुंदर दिसतेय.
-
शिवालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये चाहत्यांना निळाशार समुद्रकिनाऱ्याची झलक पाहायला मिळतेय. तिने नुकतीच ऑस्ट्रेलियातील नॉबीज सेंटर येथे भेट दिली.
-
नॉबीज सेंटर हे ऑस्ट्रेलियातील Phillip Island या सुंदर बेटावर वसलेलं आहे. हे ठिकाण समुद्रकिनाऱ्यावर असून येथील निसर्गसौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
-
नॉबीज सेंटरच्या आसपास सुंदर किनारपट्टी पाहायला मिळते. याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना चालण्यासाठी व फिरण्यासाठी सुंदर Boardwalk म्हणजेच लाकडी पायवाट तयार करण्यात आली आहे.
-
नॉबीज सेंटर हे निसर्गप्रेमी, वन्यजीव निरीक्षक आणि फोटोग्राफर्सचं आवडतं ठिकाण आहे. याठिकाणी शिवालीने कांगारूसह Cute फोटोशूट केलं आहे.
-
शिवालीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब इन्स्टाग्राम
हेही वाचा : Baby Girl! लग्नानंतर ४ वर्षांनी ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई, बाळ झाल्यावर १४ दिवसांनी शेअर केली गुडन्यूज, म्हणाली…
संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार? शिंदेंच्या चार शिलेदारांचे पद धोक्यात? वाचा ५ घडामोडी…