-
बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या तिच्या एका गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
-
‘केडी द डेव्हिल’ (KD The Devil) या आगामी चित्रपटातील ‘सरके चुनर’ या गाण्यावर सोशल मीडियातून सध्या टीकेची झोड उठत असून, त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
-
या गाण्याचे शब्द आणि कोरिओग्राफी अश्लील असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून केला जात आहे.
-
विशेष म्हणजे, खुद्द नोरा फतेहीने देखील या प्रकरणावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
-
नोराच्या म्हणण्यानुसार, तिने हे गाणे मूळतः कन्नड भाषेत चित्रित केले होते. मात्र, निर्मात्यांनी तिची कोणतीही परवानगी न घेता या गाण्याचे हिंदीत चुकीच्या पद्धतीने भाषांतर केले, असा गंभीर आरोप तिने केला आहे.
-
या वादाच्या निमित्ताने नोरा फतेहीच्या मानधनाचीही जोरदार चर्चा रंगली आहे.
-
मिळालेल्या माहितीनुसार, नोरा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या आयटम साँग परफॉर्मर्सपैकी एक आहे.
-
नोरा एका गाण्यासाठी साधारणपणे १ ते २ कोटी रुपये मानधन घेते, असे म्हटले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : नोरा फतेही/इन्स्टाग्राम)
Baby Girl! लग्नानंतर ४ वर्षांनी ‘कमळी’ फेम अभिनेत्री झाली आई, बाळ झाल्यावर १४ दिवसांनी शेअर केली गुडन्यूज, म्हणाली…