-
मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय सुंदर अभिनेत्री प्रिया बापट हिने आपल्या अदांनी पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केले आहे.
-
प्रियाचे चित्रपट आणि नाटके नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि ती आपल्या कसदार अभिनयासाठी ओळखली जाते.
-
तिने नुकतेच आपले पारंपरिक अंदाजात काही खास फोटो शेअर केले असून, तिची ही स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
-
या फोटोंमध्ये प्रियाने आकाशी निळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली असून, त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
गळ्यात सोन्याचा जड साज, कानात झुमके व कपाळावर छोटी टिकली, असा तिचा हा मराठमोळा साज अतिशय देखणा वाटत आहे.
-
तिने या लूकवर मोजकी ज्वेलरी आणि साजेसा मेकअप केला असून, तिचा हा नऊवारी साडीतील तोरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
अभिनयासोबतच प्रिया आपल्या फिटनेस आणि वर्कआऊटसाठी नेहमीच चर्चेत असते आणि चाहत्यांना प्रेरणा देत असते.
-
मराठीच नाही, तर हिंदी वेब सीरिजमध्येही प्रियाने आपल्या अभिनयाचा मोठ्या प्रमाणात ठसा उमटवला असून, तिचे नाव घराघरात पोहोचले आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्रिया बापट इन्स्टाग्राम)
Narhari Zirwal Viral Video : मंत्री झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ कुणी रेकॉर्ड केला? राज्यात नेमकं चाललंय तरी काय?