-
लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगांवकर (Ketaki Mategaonkar) सध्या तिच्या नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
-
निमित्त आहे, ‘रामनवमी २०२६’ चे. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव (Ram Navami 2026) संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
-
केतकीनेही एका खास फोटोशूटद्वारे चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या फोटोशूटसाठी केतकीने शुभ्र पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली असून त्यावर पारंपारिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
केतकीचा हा मोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
केवळ फोटोशूटच नाही, तर रामनवमीचे औचित्य साधून केतकीचे एक नवे गाणेही तिच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
-
त्यामुळे यंदाची रामनवमी केतकीच्या चाहत्यांसाठी संगीतमय मेजवानी ठरणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : केतकी माटेगांवकर/इन्स्टाग्राम)
Narhari Zirwal Viral Video : मंत्री झिरवाळ यांचा कथित व्हिडीओ कुणी रेकॉर्ड केला? राज्यात नेमकं चाललंय तरी काय?