-
सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने (Maharashtrachi Hasyajatra) केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar).
-
आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर रसिकाने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
मालिका, नाटक, चित्रपट आणि एकांकिका अशा सर्वच माध्यमांत रसिकाने आपली छाप पाडली आहे.
-
सध्या सोशल मीडियावर रसिकाच्या ‘समर लूक’ची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
नुकतेच तिने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा सुंदर ‘वन पीस ड्रेस’ परिधान केला आहे.
-
विशेष म्हणजे, रसिकाने हे फोटोशूट ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात केले असून, तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका वेंगुर्लेकर/इन्स्टाग्राम)
शोभन योगात राम नवमी! ३ राशींचा सुरु होईल शुभ काळ; कोणाला लाभेल सुख-समृद्धी तर कोणाला होईल धनलाभ; बघा तुमची रास आहे का नशीबवान