-
माधुरी दीक्षितने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत वाराणसीत रामनवमी साजरी केली.
-
निळ्या रंगाच्या बनारसी साडीत माधुरीचा पारंपरिक आणि अतिशय सुंदर लूक दिसला.
-
श्रीराम नेने यांनी वाराणसीतील या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये हे जोडपे हातात निरांजन घेऊन गंगा आरतीचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
श्रीराम नेने यांनी कॅप्शनमध्ये “भारताचा वारसा इथल्या परंपरांमध्ये रुजलेला आहे. रामनवमीसाठी वाराणसीत आल्याचा मला खूप आनंद होत आहे. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जय हिंद!” असे लिहिले आहे.
-
एका फोटोत दोघेही कुल्हडमधील चहाचा आस्वाद घेताना खूप आनंदी दिसत आहेत.
-
श्रीराम नेने यांनी पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना रामनवमी आणि नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
-
वाराणसीच्या घाटावरील या जोडप्याच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!