-
Tejaswini Lonari Samadhan Sarvankar Goa Vacation: लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या तिचे पती समाधान सरवणकर यांच्याबरोबर गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
समुद्रकिनारे आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत असतानाच, या जोडप्याने गोव्यातील प्रसिद्ध म्हाळसा नारायणी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
-
या भेटीचे काही खास फोटो तेजस्विनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
“म्हाळसा नारायणीच्या चरणी शांतता, शक्ती आणि श्रद्धेचा सुंदर संगम अनुभवला,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
तेजस्विनी आणि समाधान यांनी ४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर विवाहगाठ बांधली होती.
-
समाधान सरवणकर हे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत.
-
तेजस्विनीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?