-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दोन वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या ‘साधी माणसं’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सगळेच कलाकार भावुक झाले होते.
-
आता मालिका संपल्यावर हे सगळे कलाकार एकत्र एन्जॉय करण्यासाठी फिरायला गेले आहेत.
-
‘साधी माणसं’ मालिकेची टीम शूट संपल्यावर पनवेल येथील एका अॅग्रो फार्ममध्ये पोहोचली आहे.
-
मुख्य नायिका अभिनेत्री शिवानी बावकरने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
शिवानी या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “जेव्हा साधी माणसं…साध्या नव्हे तर स्पेशल आऊटिंगसाठी बाहेर जातात.”
-
शिवानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मालिकेतील सगळ्या कलाकारांची झलक पाहायला मिळतेय.
-
‘साधी माणसं’ मालिकेचा पहिला एपिसोड मार्च २०२४ मध्ये ऑन एअर झाला होता. आता बरोबर दोन वर्षांनी या मालिकेने सर्वांचा निरोप घेतलाय.
-
‘साधी माणसं’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या दोघांनी साकारलेली सत्या-मीराची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली.
-
‘साधी माणसं’ मालिकेत शिवानी-आकाशसह सुप्रिया पाठारे, पंढरीनाथ कांबळे, पंकज खामकर, प्रशांत चौडप्पा, प्रतिभा गायकवाड, मोनिका यांसारखे बरेच कलाकार झळकले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : शिवानी बावकर इन्स्टाग्राम )
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?