-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात सध्या चर्चेत आहे.
-
वनिता सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा मनसोक्त आनंद घेत आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या वनिताने तिच्या या खास सहलीचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये वनिता ऑस्ट्रेलियातील ‘नुसा हेड्स’ (Noosa Heads) या समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करताना दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये वनिताने काळ्या रंगाचा स्विमिंग सूट आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा ओव्हरसाईज शर्ट परिधान केला आहे.
-
मोकळे आकाश आणि अथांग समुद्र अशा सुंदर पार्श्वभूमीवर वनिताने एकापेक्षा एक जबरदस्त पोज दिल्या आहेत.
-
या फोटोंना कॅप्शन देताना तिने लिहिले आहे, “स्वतःच्या अशा एका रूपात पाऊल ठेवत आहे, जे तुम्ही याआधी कधीही पाहिले नसेल.”
-
वनिता खताचे ‘ट्रॅव्हल डायरी’ फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: वनिता खरात/इन्स्टाग्राम)
VIDEO: “आईसाहेब Hats Off..” साडी नेसून विंचू चावला गाण्यावर जबरदस्त डान्स! दोघांच्या प्रत्येक स्टेपवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा