-
झी मराठीवरील ‘शुभ श्रावणी’ (Shubh Shravani TV Serial) या मालिकेने आपल्या रंजक कथानकामुळे अतिशय कमी वेळात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
-
या मालिकेत ‘शोभा’ ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कोमल शेटे (Komal Shete) सध्या सोशल मीडियावर तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
कोमलने नुकतीच वाशी येथील ‘महालक्ष्मी सरस २०२६’ या प्रदर्शनाला भेट दिली.
-
यावेळी कोमलने परिधान केलेल्या पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
कोमलने अबोली रंगाच्या साडीपासून शिवलेला एक इंडो-वेस्टर्न पद्धतीचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
-
या लूकला अधिक उठावदार बनवण्यासाठी तिने पारंपरिक दागिन्यांची निवड केली होती.
-
मोठ्या आकाराचे कानातले, नथ, हातात कडा आणि अंगठी अशा दागिन्यांमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : कोमल शेटे/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचली… “खेळताना रंग बाई होळीचा” गाण्यावर महिलेची जबरदस्त लावणी; VIDEO होतोय तुफान व्हायरल