-
Shweta Tiwari Two Divorces and Single Motherhood: टेलिव्हिजनची गाजलेली अभिनेत्री श्वेता तिवारी आजही सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. मात्र, पडद्यावर हसणारी श्वेता खऱ्या आयुष्यात दोनदा मोडलेल्या संसाराचे दुःख पचवून उभी आहे.
-
चंदेरी दुनियेत यश मिळवूनही वैयक्तिक आयुष्यात श्वेता तिवारीच्या नशिबी मोठे संघर्ष आले.
-
श्वेताचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते, मात्र घरगुती हिंसाचारामुळे हे नाते तुटले. या लग्नातून तिला पलक तिवारी ही मुलगी आहे.
-
त्यानंतर तिने अभिनव कोहलीशी दुसरे लग्न केले, पण तिथेही तिला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, ज्यामुळे दुसरा संसारही मोडला.
-
या दुसऱ्या लग्नातून तिला रेयांश हा मुलगा आहे.
-
आज ४५ वर्षांची असूनही श्वेताने तिसऱ्या लग्नाचा विचार न करता आपल्या मुलांच्या संगोपनाला प्राधान्य दिले आहे.
-
पलक तिवारीने आता बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असून, श्वेता एक ‘सिंगल मदर’ म्हणून आपल्या मुलांसाठी खंबीरपणे उभी आहे.
-
४५ व्या वर्षीही ती आपल्या दोन मुलांचा, पलक आणि रेयांशचा सांभाळ करत एकटीच जीवन जगत आहे.
-
(फोटो- श्वेता तिवारी इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचली… “खेळताना रंग बाई होळीचा” गाण्यावर महिलेची जबरदस्त लावणी; VIDEO होतोय तुफान व्हायरल