-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मधून (Tujhyat Jeev Rangala) घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगांवकर (Dhanashri Kadgaonkar) सध्या तिच्या एका नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
या मालिकेत ‘नंदिनी वहिनी’ (वहिनीसाहेब) ही नकारात्मक भूमिका साकारून धनश्रीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
-
नुकतेच धनश्रीने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी धनश्रीने लाल रंगाचा सॅटिन गाऊन परिधान केला असून, तिचा हा बोल्ड आणि ब्युटीफुल लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.
-
या फोटोंना धनश्रीने ‘Weekend Vibes’ असे कॅप्शन दिले आहे.
-
धनश्रीने केवळ ‘तुझ्यात जीव रंगला’च नव्हे, तर ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’ आणि ‘तू चाल पुढं’ अशा विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
धनश्रीच्या या लेटेस्ट फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगांवकर/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचली… “खेळताना रंग बाई होळीचा” गाण्यावर महिलेची जबरदस्त लावणी; VIDEO होतोय तुफान व्हायरल