-
सोनी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका ‘स्वराज्यजननी जिजामाता’मधून (SwarajyaJanani Jijamata TV Serial) घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमृताने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले असून तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
या फोटोशूटसाठी अमृताने निळ्या रंगाची नारायणपेठ नऊवारी साडी नेसली आहे.
-
या लूकला अधिक उठावदार बनवण्यासाठी अमृताने परिधान केलेले पारंपरिक दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
नाटकांपासून अभिनयाचा प्रवास सुरू करणाऱ्या अमृताला मालिकांमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली.
-
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, जुलै २०२२ मध्ये अमृताने नील पाटीलबरोबर विवाहगाठ बांधली.
-
गेल्या वर्षी मे महिन्यात या दांपत्याने आपल्या गोंडस मुलाचे ‘निवान’चे स्वागत केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता पवार/इन्स्टाग्राम)
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम