-
Hanuman Jayanti 2026: आज देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
-
पौराणिक मान्यतेनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता आणि राजा केसरी यांच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला.
-
या मंगलमयी दिनाचे औचित्य साधत मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
चैत्र पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सायलीचा हा पारंपारिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या फोटोंमध्ये सायलीने गुलाबी रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली असून त्यावर निळ्या रंगाचा हत्तीची एम्ब्रॉयडरी असलेला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
मोत्यांचे दागिने आणि सुबक हेअरस्टाईलमुळे सायलीचं सौंदर्य खुललं होते.
-
सायलीच्या या फोटोंवर अभिनेत्री रेश्मा शिंदेने ‘Sundru’ (सुंदरू) अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
हनुमान जयंतीला ध्रुव योग जुळून आल्याने चहूबाजूंनी बरसणार सुख; चिंता मिटतील, इच्छा पूर्ण होतील; तुमच्या नशिबात आज काय?