-
‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
-
रिंकूचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिच्या फोटोशूटची, नव्या लूकची नेहमीच चर्चा होते.
-
रिंकूने शेअर केलेल्या नुकत्याच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे अभिनेत्रीच्या घरी एका खास पाहुण्याचं आगमन झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या फोटोंमध्ये रिंकूचा नवा लूक पाहायला मिळतोय.
-
रिंकू राजगुरू प्राणीप्रेमी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. यापूर्वीही रिंकूने अनेकदा पाळीव प्राण्यांबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, आता अभिनेत्रीच्या घरी रोमिओ या श्वानाचं आगमन झालेलं आहे.
-
रिंकूने रोमिओबरोबर खास फोटोशूट करत ही आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांना सांगितली आहे.
-
“या चिमुकल्या पावलांनी माझ्या आयुष्यात प्रवेश केला अन् आता सगळं काही बदलून गेलंय. Meet my baby…रोमिओ” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
याशिवाय या फोटोंमध्ये रिंकूचाही नवीन हेअरलूक पाहायला मिळतोय.
-
एका फोटोमध्ये रिंकू आणि रोमिओ मिरर सेल्फीसाठी पोझ देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
दरम्यान, रिंकू आणि रोमिओच्या या गोड फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम )
Video: मीनाक्षी शेषाद्रींनी ३८ वर्षांपूर्वीच्या स्वत:च्याच गाण्यावर केला डान्स; अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेले काम