-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
-
या लोकप्रिय कार्यक्रमाच्या चाहत्यांमध्ये सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांचा समावेश आहे.
-
सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम लाईव्ह परफॉर्मन्सच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.
-
या दौऱ्यादरम्यान, या शोमधील प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरातने (Vanita Kharat) सिडनीच्या ऐतिहासिक ऑपेरा हाऊस येथे एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या खास लूकसाठी वनिताने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला होता.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना वनिताने ‘मी आणि माझ्या मागे जगातील एक अतिशय सुंदर दृश्य’ असे कॅप्शन दिले आहे.
-
वनिताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)
महिनाभर भात न खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? आहारतज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त परिणाम