-
‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट.
-
ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चाहत्यांची लाडकी असलेली ही जोडी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
-
सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि नील यांच्यातील दुराव्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
-
‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती.
-
ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट यांच्या वयात पाच वर्षांचे अंतर आहे.
-
या जोडीने ३० नोव्हेंबर २०२१ रोजी उज्जैनमध्ये अतिशय थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.
-
ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट दोघे बिग बॉस हिंदीत एकत्र सहभागी झाले होते. हा शो संपल्यानंतरच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत.
-
विशेष म्हणजे, या गंभीर विषयावर दोघांनीही अद्याप मौन बाळगले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट यांच्यातील दुरावा संपावा व ते एकत्र यावे, असं चाहते म्हणत आहेत.
-
(फोटो- ऐश्वर्या शर्मा इन्स्टाग्राम)
शिंदे गटाचे २५ आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत? शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी; वाचा ५ घडामोडी…