-
लोकप्रिय अभिनेत्री शिवानी बावकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
-
शिवानीने नुकतेच आपले काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या नवीन फोटोंमध्ये शिवानीने मरून रंगाचा सुंदर ‘प्रिंटेड एथनिक ड्रेस’ परिधान केला असून, तिचा लूक अत्यंत मोहक दिसत आहे.
-
गुलाबी फुलांच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या या फोटोंमध्ये शिवानीचे स्मित चाहत्यांचे काळीज जिंकत आहे.
-
‘Just a day well spent’ अशी कॅप्शन देत शिवानीने तिच्या या आनंदी दिवसाची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
मोकळे सोडलेले लांबसडक केस आणि कानातले झुमके तिच्या या साध्या, पण प्रभावी लूकला अधिकच खुलवत आहेत.
-
शिवानी नुकतीच स्टार प्रवाहवरील ‘साधी माणसं’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र, आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
शिवानीने तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात ‘लागिरं झालं जी’ या प्रचंड गाजलेल्या मालिकेतून केली होती, जिथे तिची ‘शीतली’ची भूमिका आजही घराघरात लोकप्रिय आहे.
-
(सर्व फोटो साभार- शिवानी बावकर इन्स्टाग्राम)
“ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल?” जुना फोटो बघून तुम्हीही पडाल प्रेमात, Video एकदा पाहाच