-
Sana Saeed Transformation: शाहरुख खानच्या गाजलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी छोटी अंजली म्हणजेच अभिनेत्री सना सईद (Sana Saeed) आता ३७ वर्षांची झाली आहे.
-
२८ वर्षांच्या या प्रवासात सनाच्या लूकमध्ये जमीन अस्मानाचा फरक पडला आहे.
-
सना आता प्रचंड ग्लॅमरस आणि बोल्ड झाली असून ती सोशल मीडियावर सातत्याने आपले फोटो शेअर करत असते.
-
चित्रपटसृष्टीत ‘स्टुडंट ऑफ द इयर’ सारख्या चित्रपटात काम केल्यानंतर तिला अपेक्षित यश मिळाले नाही, मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे.
-
‘कुछ कुछ होता है’ नंतर ती ‘स्टुडंट ऑफ द इयर’ सारख्या काही चित्रपटांत आणि काही डान्स रियालिटी शोमध्ये दिसली, पण तिला अपेक्षित यश मिळाले नाही.
-
२०२३ मध्ये सनाने तिचा बॉयफ्रेंड साबा वॉनरशी साखरपुडा केला. तो हॉलीवूडमध्ये साउंड डिझायनर असून लॉस एंजेलिसमध्ये राहतो.
-
सना त्याच्याबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
सध्या सना लॉस एंजेलिसमध्ये बॉयफ्रेंडबरोबर राहतेय.
-
(सर्व फोटो- सना सईद इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प