-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझ्या सोबतीने’ (Tuzya Sobatine TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nemkar) ही ‘तायडी’ या नकारात्मक (खलनायिकेच्या) भूमिकेतून घराघरात पोहोचली आहे.
-
आपल्या व्यग्र कामातून वेळ काढत माधवीने नुकतेच तुळजापूरच्या (Tuljapur) आई भवानीचे मनोभावे दर्शन घेतले.
-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते.
-
धाराशिव जिल्ह्यातील हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे.
-
या दर्शनावेळी माधवीने पेस्टल रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
माधवीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प