-
मुंबईतील प्रसिद्ध ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रा’च्या (NMACC) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
३१ मार्च २०२६ रोजी या केंद्राला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ३ एप्रिल रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सिनेसृष्टीतील तारे-तारकांनी हजेरी लावली.
-
या सोहळ्यात सर्वांच्या नजरा खिळल्या त्या बॉलिवूडची ‘क्युट जोडी’ रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांच्यावर.
-
रेड कार्पेटवर या जोडीने आपल्या हटके आणि स्टायलिश लूकने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली.
-
या खास प्रसंगी रितेशने काळ्या रंगाचा क्लासिक डिझाईनर सूट परिधान केला होता, ज्यामध्ये तो अत्यंत देखणा दिसत होता.
-
तर, पती रितेशला साजेशी साथ देत जिनिलीयाने देखील काळ्या रंगाचा अतिशय स्टायलिश आऊटफिट परिधान केला होता.
-
रितेश आणि जिनिलीया हे नेहमीच त्यांच्या साध्या तरीही प्रभावी फॅशन सेन्ससाठी ओळखले जातात.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प