-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) आपल्या ऐतिहासिक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली प्राजक्ता सध्या तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने सोनेरी रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
मात्र, या संपूर्ण लूकपेक्षाही सध्या चर्चा रंगली आहे ती प्राजक्ताने परिधान केलेल्या छोट्या मंगळसूत्राची.
-
प्राजक्ताचे हे सिम्पल मंगळसूत्र डिझाईन चाहत्यांना प्रचंड आवडले आहे.
-
प्राजक्ता गेल्या वर्षी २ डिसेंबर २०२५ रोजी शंभुराज खुटवड यांच्याशी विवाहबंधनात अडकली.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प