-
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णी आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मने जिंकते.
-
सौंदर्य आणि दमदार अभिनय यांच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि नुकतीच तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमध्ये सोनालीने विदर्भातील प्रसिद्ध अशा ‘करवतकाठी’ साडीत तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
नागपूर येथील ‘स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’च्या ग्रॅज्युएट फॅशन शोमध्ये तिने हे खास साडीचे रूप परिधान केले होते.
-
पांढऱ्या रंगाच्या या करवतकाठी साडीला गडद रंगाची आणि कलाकुसर असलेली किनार अत्यंत शोभून दिसत आहे.
-
सोनालीने या साडीवर हाय-नेक स्टाईलचा आणि लांब बाह्यांचा एक स्टायलिश जॅकेट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
तिच्या या लूकला पारंपरिक टच देण्यासाठी तिने कानात जड झुमके आणि हातात आकर्षक बांगड्या घातल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार- सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प