-
‘मुरांबा’ मालिकेतील लाडकी ‘रमा’ म्हणजेच अभिनेत्री शिवानी मुंढेकर सध्या तिच्या नवीन लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. -
शिवानीने नुकतेच मुंबईच्या अथांग समुद्रकिनाऱ्यावर एक खास फोटोशूट केले असून तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने निळ्या रंगाचा नक्षीदार ब्लाऊज आणि सुंदर जांभळ्या रंगाची साडी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
वाऱ्याने उडणारे केस आणि समुद्राच्या पार्श्वभूमीवर शिवानीचे हे सोज्वळ रूप अधिकच खुलून दिसत आहे.
-
स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर असून प्रेक्षक या मालिकेला भरभरून प्रतिसाद देत आहेत.
-
मालिकेत रमाची मुख्य भूमिका साकारणाऱ्या शिवानीच्या साध्या आणि सोज्वळ अभिनयावर रसिक प्रेक्षक फिदा झाले आहेत.
-
साडीतील या पारंपरिक लूकला शिवानीने अतिशय आत्मविश्वासाने कॅरी केले असून तिचे सौंदर्य यात अधिकच उठावदार दिसतेय.
-
सोशल मीडियावर तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्सनी तिच्या या रूपावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प