-
‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या वतीने आयोजित मानाचा ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ सोहळा रविवार, ५ एप्रिल रोजी मुंबईत अत्यंत दिमाखात पार पडला.
-
या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींनी आपल्या फॅशन स्टाईलने रेड कार्पेटवर सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
-
नेहमीप्रमाणे आपल्या साधेपणाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या आलिया भट्टने यावेळी पांढऱ्या रंगाची नक्षीदार डिझायनर साडी नेसली होती.
-
गुनीत मोंगा एका स्टायलिश सूट आणि चेक्स पँटमध्ये दिसली.
-
रसिका दुग्गलने निळ्या रंगाच्या ड्रेसवर कॉन्ट्रास्ट ब्राऊन बेल्ट लावून आपला लूक पूर्ण केला होता.
-
सबा आझादने निळ्या रंगाचा कट असलेला ड्रेस निवडला होता.
-
शिल्पा रावने काळ्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी सूटमध्ये आपला साधेपणा जपला.
-
श्रेया चौधरीने आपल्या बोल्ड फॅशनने सर्वांचे लक्ष वेधले. तिने मरून रंगाचा लेदर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.
-
शुभांगी अत्रे फिकट हिरव्या रंगाच्या साडीत रेड कार्पेटवर खूपच सुंदर दिसत होती.
-
निमरत कौर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अत्यंत ग्लॅमरस दिसत होती.
-
(सर्व फोटो – नरेंद्र वास्कर, इंडियन एक्सप्रेस)
US F-15 Pilot Rescue Operation: “गॉड इज ग्रेट!” अमेरिकी पायलटच्या ‘त्या’ ३ शब्दांनी उडाला गोंधळ; इराणच्या जबड्यातून कशी केली सुटका?