-
मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णीने नुकताच आपला २५ वा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा केला.
-
तिने तिच्या खास दिवसाचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये गौरीने काळ्या रंगाचा एक स्टायलिश को-ऑर्ड सेट परिधान केल्याचे दिसत आहे.
-
मोकळे केस आणि कूल सनग्लासेसमुळे तिचा हा वेस्टर्न लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
हातात पांढऱ्या गुलाबांचा गुच्छ आणि समोर असलेला पंचविसाव्या वाढदिवसाचा केक तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
गौरीने या पोस्टला ‘HAPPY 25th to ME’ अशी साधी, पण प्रभावी कॅप्शन दिली आहे.
-
गौरी कुलकर्णीने स्टार प्रवाहवरील अबोली या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
तिच्या या फोटोंवर चाहते आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- गौरी कुलकर्णी इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष