-
Gaurav More Wife Priyanka Karekar: महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर गौरव मोरे आणि अभिनेत्री प्रियंका कारेकर विवाहबंधनात अडकले आहेत.
-
ऋजुता बागवेने फोटो शेअर केल्यावर सर्वांना गौरव मोरेच्या लग्नाबद्दल समजलं.
-
आता सर्वांनाच प्रियंका कारेकरबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
-
प्रियंका कारेकर ही केवळ गौरवची पत्नी म्हणून नाही, तर एक अभिनेत्री आहे.
-
तिने आर. बाल्की दिग्दर्शित ‘चूप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.
-
चूप सिनेमात तिने दुलकर सलमानसारख्या बड्या स्टारसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
-
गौरव मोरे आणि प्रियंका यांच्या प्रेमकथेचे आता लग्नात रूपांतर झाल्याने मराठी मनोरंजन विश्वात त्यांचे स्वागत होत आहे.
-
प्रियंका कारेकर गौरव मोरे काही काळापासून डेट करत होते. प्रियंका गौरवबरोबर मराठी सिनेसृष्टीतील इव्हेंट्सला हजेरी लावायची.
-
गौरव मोरे व प्रियंका कारेकरवर सर्वजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
(फोटो- ऋतुजा बागवे व प्रियंका कारेकर इन्स्टाग्राम)
Photos: “मला तुझी मुलगी असल्याचा खूप अभिमान…”; अमृता फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी दिविजा फडणवीसची भावूक पोस्ट