-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
-
गौरवने नुकतीच आपली मैत्रीण प्रियांका कारेकरशी (Priyanka Karekar) गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.
-
गौरवची पत्नी प्रियांका कारेकर ही देखील मनोरंजनसृष्टीशी संबंधित आहे.
-
प्रियांकाने बॉलिवूडमधील काही नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे.
-
प्रियांका ही मुंबईतील लालबाग-परळ परिसरातील राहणारी असून, गौरव आता खऱ्या अर्थाने गिरणगावचा जावई झाला आहे.
-
गौरवने आपल्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती.
-
मात्र, त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री ऋतुजा बागवेने सोशल मीडियावर गौरव आणि प्रियांकाचा फोटो शेअर करत या बातमीवर शिक्कामोर्तब केले.
-
ऋतुजाने ‘मिस्टर अँड मिसेस मोरे’ यांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी आणि नवीन घरासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
-
लग्नाबरोबरच गौरवने मुंबईत स्वत:चे नवीन घरही घेतले आहे. या घराच्या दरवाजावरील नेमप्लेटने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या पाटीवर ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ असे मजेशीर आणि अभिमानास्पद नाव कोरलेले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरव मोरे/इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष