-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या आपल्या आयुष्यातील एका अतिशय सुखद टप्प्याचा आनंद घेत आहे.
-
वैवाहिक जीवनाला १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर वयाच्या ४१ व्या वर्षी दिव्यांकाच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे.
-
दिव्यांकाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नुकताच अत्यंत शाही थाटात पार पडला.
-
आपल्या लाडक्या ‘इशिमा’च्या या खास सोहळ्यासाठी अभिनेत्री रुहानिका धवनने विशेष हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यातील काही टिपलेले सुंदर क्षण रुहानिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
जुन्या आणि नवीन फोटोंचा एक कोलाज पोस्ट करून रुहानिकाने ‘ये है मोहब्बतें’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
-
“आई हे आयुष्यातील सर्वात सुंदर पान असतं आणि सुदैवाने माझ्या आयुष्यात अशा दोन व्यक्ती आहेत; आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे—माझ्या ऑन-स्क्रीन ‘इशिमा’ला खऱ्या आयुष्यात आई होताना पाहणं ही एक पर्वणीच आहे. @divyankatripathidahiya, आपण भेटल्यापासून तू माझ्यासाठी आईसारखीच राहिली आहेस. या नवीन प्रवासासाठी तुझ्यापेक्षा जास्त भारी आणि प्रेरणादायी व्यक्ती दुसरी कोणीच असू शकत नाही,” असे भावनिक कॅप्शन तिने दिले आहे.
-
चाळिशीनंतर आई होण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांकडून आणि मनोरंजन सृष्टीतून दिव्यांकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रुहानिका धवन/इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष