-
आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
आलिया पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. आलियाने काल ५ एप्रिल रोजी (रविवारी) पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस्’मध्ये सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.
-
आलियाने पहिल्यांदाच पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालक म्हणून काम केल्याचं तिनं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून म्हटलं आहे. आलियाने यावेळी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिचा अनुभव सांगितला आहे आणि या पुरस्कार सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
आलियाने ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’मधील फोटो शेअर करत मजेशीर कॅप्शन दिली आहे. ती म्हणाली, “लेडीज अँड जंटलमेन, गर्ल्स अँड बॉईज… कालची रात्र मी पडद्यावर आणि पडद्यामागे खूप धमाल केली. पहिल्यांदाच मी सूत्रसंचालन केले आणि यासाठी झाकीर खान व सुनील ग्रोवर यांच्यापेक्षा चांगले सहकारी मिळणे अशक्य होते.”
-
आलिया पुढे सूत्रसंचालन करण्याचा अनुभव सांगत म्हणाली, “मी आलिया भट्ट आता तुमची रजा घेते सलग चार तास मी सूत्रसंचालन केलं आहे, संवाद साधला आहे. आता मी मंगळवारपर्यंत बोलणार नाही.”
-
आलियाने यावेळी झाकीर खान, सुनील ग्रोवर यांच्याबरोबरचे सूत्रसंचालनावेळी धमाल करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
-
आलिया भट्टने शेअर केले ‘चेतक सक्रीन अवॉर्डस्’मधील खास फोटो (फोटो : इन्स्टाग्राम)
-
आलियाने या पांढऱ्या रंगाच्या साडीवर गळ्यामध्ये डायमंडचा डिझायनर चोकर, कानात नाजूक डूल आणि हातात डिझायनर अंगठी घालून तिने हा लूक पूर्ण केला. यामुळे तिचा हा लूक अजूनच उठून दिसत आहे.
-
आलियाने यासह ब्लॅक ब्लेझर, पँट आणि टाय असा एक बॉसी लूकसुद्धा केला. अभिनेत्रीनं या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ब्लेझर आणि वेस्टकोटमुळे आलिया यामध्ये खूप डँशिंग दिसत आहे. आलियानं यावर टायसुद्धा परिधान केला. ज्यावर खास डिझायनर ब्रोच आहे.
-
आलियाने यावेळी केस मोकळे सोडत साधा आणि सोपा मेकअप केला ज्यामुळे ती खूपच क्लासी दिसत आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष